पंढरपूर प्रतिनिधी
विवेक वर्धिनी विद्यालय येथे डॉ. सी. व्ही.रामण यांचे स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाराध्ये यांनी प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये आपले करिअर निर्माण करावे, दैनंदिन जीवनात विज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा, अंधश्रद्धा दूर करावी, सर्वोच्च सन्मान नोबेल पारितोषिक याबद्दलची माहिती सांगून वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची माहिती विद्यार्थ्यांसमोर विशद केली. त्याप्रसंगी प्रशालेतील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींची उत्स्फूर्त भाषणे केली.त्यात अनेक शास्त्रज्ञांची माहिती त्यांनी भाषणात सांगितली.
याप्रसंगी सुनील गुरव, व कांचन टकले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक संजय क्षीरसागर,भारत झांबरे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट काळेल यांनी केले तर आभार श्रीकांत चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनी ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.