सोलापूर प्रतिनिधी
कालकथित वामन शंकर सोरटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्राचे प्रख्यात संमोहन तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे यांनी मानसिक समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी 13 फेब्रुवारी रोजी मोफत हिप्नॉटिझम समुपदेशन शिबिर आयोजित केलेले असून या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या मानसिक आणि मनोशारीरिक समस्यांवर हिप्नॉटिझम द्वारे सल्ला मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर शिबिराची वेळ दुपारी 12 ते 2 असून यावेळेत मानसिक समस्या निद्रानाश,हस्तकंप, तोतरेपणा, लैंगिक समस्या, अनामिक भीती चिंता,नैराश्य यावर वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संमोहनतज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे यांनी केले आहे.या शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक असून खालील 9890902086, 9890072086 या क्रमांकावर नावनोंदणी करावी असे आवाहन संयोजिका डॉक्टर अलका सोरटे यांनी केले आहे.
शिबिराचा पत्ता 70, नवी पेठ फेवरेट फॅशन समोर योगेश पवार यांचे शिव संदेश फायनान्शियल सर्व्हिसेस च्या वरती सोलापूर 413 007 या पत्यावर संपर्क साधावा.