दापोली प्रतिनिधी
केळशी येथील पी.डी. विद्यालयातील हे ग्रामीण भागातील हायस्कूल असून या हायस्कूलचा विद्यार्थी आर्यन दत्तात्रय माळवदे याने जुलै २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत २९८ पैकी १९६ गुण मिळवून दापोली तालुका गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक तर जिल्हा गुणवत्ता यादीत १०९ वा क्रमांक पटकावून उज्वल यश संपादन केले आहे.
या यशासाठी आर्यनला शालेय समितीचे अध्यक्ष उल्हास वर्तक यांनी प्रोत्साहन दिले. त्याला विद्यालयाचे मुख्याध्यापक प्र क सोनवलकर, शिक्षक पी. एम. कांबळे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षक प्रकाश धावरे आणि आई दिप्ती माळवदे या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
आर्यनच्या या उज्वल सुयशाबद्दल संपूर्ण केळशी पंचक्रोशीतून आर्यनचे कौतुक होत आहे. तसेच तेज न्यूज चॅनल कडून हि अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.