पंढरपूर प्रतिनिधी
सनराईज पब्लिक स्कूल,शेळवे आयोजित मैत्रीपूर्ण सनराईज कप क्रिकेट स्पर्धा अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडल्या; आज झालेल्या सनराईज कप क्रिकेट सामन्यात एकूण तीन संघ सहभागी झाले,त्यामध्ये सनराईज पॅरेन्ट्स ए (शेळवे,भंडीशेगाव,पिराची कुरोली,वाडी-कुरोली,बाजीराव विहीर) कॅप्टन: सुधाकर गाजरे सर विरुद्ध सनराईज पॅरेन्ट्स बी( खेड भाळवणी, कौठाळी,वाखरी, होळे, पंढरपूर, खेडभोसे,आजोती, पंढरपूर) कॅप्टन:विकास साळुंखे असा पहिला सामना झाला कर्णधार सुधाकर गाजरे सर यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली व सात ओव्हर मध्ये 62 धावांचे आव्हान दिले मात्र सनराईज पॅरेन्ट्स बी संघाला फक्त 50 धावाच करता आल्या व सनराईज पॅरेन्ट्स ए हा संघ 12 धावांनी विजयी होऊन फायनल मध्ये पोहचला;फायनल मध्ये सणराईज पॅरेन्ट्स ए संघ सनराईज स्टाफ च्या विरोधात उत्कृष्ट रणनीती आखून खेळला,प्रथम फलंदाजी करत त्यांनी सहा ओव्हर मध्ये 51 धावा केल्या,व विजयासाठी फक्त 52 धावांचे लक्ष्य दिले,सनराईज स्टाफ च्या बाजूने अजित लोकरे सर आणि शहाजी पाटील यांनी उत्कृष्ट सुरवात करत फक्त दोन ओव्हर मध्ये 31 धावा केल्या,सामना पूर्णपणे एकतर्फी होत असताना प्रकाश जमदाडे आणि दिपक गाजरे यांनी शेवटच्या चार ओव्हर मध्ये अचूक गोलंदाजी करत सामना रोमहर्षक स्थितीत आणला, शेवटच्या ओव्हर मध्ये सात धावांची गरज असताना फक्त तीनच धावा देत सनराईज पॅरेन्ट्स ए संघाने सनराईज स्टाफ चा पराभव करत रोमहर्षक विजय संपादन करत सणराईज ट्रॉफी वर आपले नाव कोरले...!!
पंच म्हणून ऋषिकेश गाजरे,अमोल जाधव, विजय गाजरे, समीर पवार व एस टी गाजरे यांनी काम पाहिले तर स्कोरर म्हणून मोहन गायकवाड, ऋषिकेश पवार,अंकुश गाजरे यांनी काम पाहिले तसेच सामन्याचे समालोचनाची धुरा प्रकाश तात्या गाजरे व अजित लोकरे यांनी सांभाळली.
प्रत्येक टीम मधील प्रत्येक पालकांनी आजच्या सामन्यात अतिशय चांगल्या खेळाडूंची भूमिका बजावली, सर्व पालकांनी खिळाडूवृत्ती दाखवून जय पराजय हसत खेळत साजरा केला, आपल्या पालकांना खेळताना पाहून पोरांच्या चेहऱ्यावरील भावमुद्रा अतिशय आनंदी आणि पाहण्यासारख्या होत्या, स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी कष्ट घेणाऱ्या प्रत्येक घटकांचे आभार तसेच सहभागी सर्व आदरणीय पालकांचे,विजयी झालेल्या टीम मधील प्रत्येक खेळाडूंचे सणराईज परिवाराच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले, विजयासाठी भरघोस प्रयत्न केलेल्या मात्र यशापासून किंचित दूर राहिलेल्या पालक खेळाडूंना पुढील सामन्यासाठी भरभरून शुभेच्छा व सर्व सहभागीचे सनराईज परिवाराच्या वतीने अंतःकरण पूर्वक आभार....!!