सोलापूर प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल येथील संगमेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त राज्याचे महसूल, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान मंदिरास भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे आदि उपस्थित होते. संतश्रेष्ठ गाडगेबाबा आणि संतश्रेष्ठ श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या चरण स्पर्शाने श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान पावन झालेले आहे. या देवस्थानच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी मदत करू, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिली.