पंढरपुर प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद यांचा आदर्श समोर ठेवून समर्पित भावनेने काम करणारी संघटना म्हणजे ग्राहक पंचायत होय असे प्रतिपादन अ. भा.ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते यांनी केले.स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी ग्राहक पंचायतीचे आराध्य दैवत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये यांनी सर्वांचे स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना संघटनेतील कार्यकर्त्यांनी स्वामी विवेकानंदांप्रमाणे समर्पण भावनेने कार्य करणे गरजेचे आहे असे मत विनोद भरते यांनी व्यक्त केले.
सोलापूर जिल्हा संघटक दीपक इरकल यांनी सोलापूरचे हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी,जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन,श्रीकिसन सारडा यांना अभिवादन करून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा विस्तृत परिचय करून दिला व त्यांचा आदर्श घेऊनच ग्राहक चळवळीत काम करावे असे आवाहन केले.
ग्राहक पंचायतीचे प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख यांनी ग्राहक पंचायतीची कार्य परंपरा याबाबतची माहिती कार्यकर्त्यांना दिली.
ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी कार्यकर्ता व पदाची जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.जिल्हा सचिव सुहास निकते तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, सहसचिव दिलीप पाठक,सहसंघटक आझाद अल्लापूरकर यावेळी उपस्थित होते.
नूतन सदस्य सागर शिंदे व श्रीकांत वीरकर यांचे ग्राहक पंचायतीमध्ये स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सचिव प्रा.धनंजय पंधे यांनी केले तर आभार जिल्हा कार्यकारिणी सदस्य पांडुरंग अल्लापूरकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका कार्यकारिणी सदस्य श्रीराम साळुंखे, संजय खंडेलवाल, मिलिंद देवल, किशोर खंडागळे यांनी परिश्रम घेतले.