ईगतपुरी तालुका प्रतिनिधी - नवनाथ गायकर
म्हसुर्ली ता.ईगतपुरी येथील रहिवासी तथा भगुर ता.नाशिक माध्यमीक विदयालयातील प्राध्यापक व सुप्रसिध्द शिव व्याख्याते ह.भ.प.देविदास महाराज वारुंगसे यांची विश्व हिंदू परिषद नाशिक जिल्हा ग्रामीण मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे येथे विश्व हिंदू परिषदेच्या आयोजीत बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली आहे.
ह.भ.प.देविदास महाराज वारुंगसे हे गेली दोन दशके बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माध्यमातुन हिंदु धर्म जनजागृति चे कार्य करत आहे.
वारुंगसे यांच्या निवडीचे आमदार सौ. सिमाताई हिरे, राजेद्रं जडे, रामसिंग बावरी, पुरुषोत्तम आव्हाड आदीसह अनेकानीं अभिनंदन केले आहे.
हिंदु धर्मासाठीच जीवन - वारुंगसे
हिंदु धर्म जनजागृति चे काम आपण अविरत पणे करत असुन हिंदु संघटित व्हावा, जागरुक व्हावा यासाठीच आपले जीवन समर्पित आहे असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हा मंत्री देविदास महाराज वारुंगसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतानां केले आहे.