भाळवणी प्रतिनिधी
सोलापूर ग्रामीण पोलीस अंतर्गत पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने 34 वा रस्ता सुरक्षा अभियान मोहिमेअंतर्गत भाळवणीत न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी प्रशालेतील शिक्षक, एनसीसी स्कॉड विद्यार्थी विद्यार्थिनी व पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस अंमलदार असे मिळून यांच्या वतीने रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीचे आयोजन पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संतोष जगताप, शहाजी मोठे, पोलीस नाईक वाहतूक शाखेचे पठाण तसेच पोलीस हवालदार सुनील जाधव, पोलीस कॉन्स्टेबल मुलानी, सरकारी वाहनासह गावातील मुख्य पेठेतून रॅली काढण्यात आली.
यावेळी रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त विविध प्रकारच्या वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, अशा स्वरूपाच्या घोषणा देऊन नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याविषयी जनजागृती करण्यात आली.
या रॅलीमध्ये न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी प्रशालेचे मुख्याध्यापक एन एम गायकवाड,शिक्षक, विद्यार्थी यांनी सहभाग घेऊन, परिश्रम घेतले.