सोलापूर प्रतिनिधी
विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळेत स्काऊट गाईडच्या माध्यमातून 'खरी कमाई ' उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील ५० स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी खरी कमाई या उपक्रमात सहभाग घेऊन विनायक नगर परिसरातील नागरिकांना व पालकांना भेटून ४१४७ रुपये जमा केले.यामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबन, निर्भीड वृत्ती, संघर्षावर मात आदी विविध धडे देण्यात आले.या विद्यार्थ्यांना स्काऊट मास्टर हणमंत कुरे व गाईड कॅप्टन वैशाली गुजर यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार, मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आंळगे, सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले.
- स्वावलंबनाद्वारे आत्मविश्वास
स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व समजावे,श्रम मुल्याची जाणिव व्हावी, श्रमाची सवय असावी, स्वावलंबनाद्वारे आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी खरी कमाई उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी सांगितल्या.