सोलापूर प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर अधिष्ठातांमधून
केगाव येथील एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांची निवड झाली आहे. विद्यापिठाच्या माध्यमातून विद्यार्थी हिताचे निर्णय घेणारे सभागृह म्हणून व्यवस्थापन परिषदेचा नावलौकीक आहे. कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्यासह इतर अधिकारी, तसेच अधिष्ठाता, प्राध्यापक, पदवीधर, संस्थाचालक व प्राचार्यांमधून प्रत्येकी दोन आणि राज्यपाल नियुक्त एक, असे जवळपास १८ सदस्य व्यवस्थापन परिषदेवर असतात. विद्यापीठ प्रशासनाने विविध अभ्यासक्रमाच्या अधिष्ठातांमधून सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांची निवड केली आहे.
विमा पॉलिसी संपर्क 8329354008प्राचार्य डॉ. शंकर नवले यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड झाल्याबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शेखर जगदे व डॉ. रवींद्र व्यवहारे, इस्टेट ऑफीसर डॉ. दत्तात्रय नवले, डॉ. प्रदीप तपकीरे, डॉ. दत्तात्रय गंधमल, डॉ.विनोद खरात प्रा.विजय बिरादार तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले