मारापुर प्रतिनिधी
विनायक यादव मित्र मंडळ सोलापूर यांनी भागवत चित्रमंदिर सोलापूर येथे मंगळवेढा तालुक्यातील मारापुर ग्रामपंचायत च्या सरपंचपदी विनायकराव यादव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी सीए केदार सर, नरेश रावूळ, सूरज माने, विशाल दुलंगे, रवी गावडे, अनिल कोडम व इतर उपस्थित होते.
यावेळी सरपंच यादव म्हणाले,की शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या विविध प्रकारच्या योजना ,कार्यक्रम गावात राबविले जातील.युवक,महिला यांच्या करिता विविध प्रकारचे दाखले,उतारे,कागदपत्रे तात्काळ मिळण्यासाठी प्रयत्न करीत राहीन.