प्रोे.डॉ.एच.के.अभ्यंकर व अखिलेश अभ्यंकर यांनी मार्गदर्शन केले.
सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅनडा देशात विद्यार्थ्यांना करिअरच्या मिळणाऱ्या संधी या विषयावर प्रोे.डॉ.एच.के.अभ्यंकर व अखिलेश अभ्यंकर यांनी मार्गदर्शन केले. स्किल असलेल्या विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी अनेक संधी कॅनडा या देशात मोठया प्रमाणात उपलब्ध आहेत. कॅनडा या देशाची लोकसंख्या कमी असल्यामुळे या देशात नागरिकांना औषधोपचार तसेच पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण मोफत दिले जाते.
कॅनडा हा देश लहान असून त्या देशामध्ये पाच विद्यापीठे आहेत. कॅनडा या देशामध्ये कोणतेही काम सहजरीत्या उपलब्ध होते. या देशात नोकरीसाठी जाताना इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. कॅनडा या देशात पैसे भरपूर मिळतो पण त्यापटीत खर्च ही खूप असतो. बाहेरील देशातील पैसा भारतात येणे आवश्यक आहे. कॅनडा मध्ये जन्मलेल्या मुलांना शासन अनुदान देते. कमी वयात नोकरी मिळवणे आवश्यक आहे. या देशात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक करीअरच्या संधी उपलब्ध असल्याचे मत अखिलेश अभ्यंकर यांनी व्यक्त केले.या दरम्यान सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले व डॉ.एस.एस. शिरगण यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर डॉ. एच.के. अभ्यंकर व अखिलेश अभ्यंकर यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ शेखर जगदे व डॉ. रवींद्र व्यवहारे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते.