सोलापूर प्रतिनिधी
मुळेगाव ( ता. दक्षिण सोलापूर) येथे महिला मेळावा तथा औद्योगिक शिलाई मशीन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात आ.प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 30 महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आलं.
कार्यक्रमात बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, आज समाजामध्ये महिलांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु त्या महिला अनेक वेळा व्यक्त करीत नाहीत. त्यामुळे महिला वरील दिवसेंदिवस अन्याय वाढत आहे. महिलांनी आपल्यावरील अन्याय दूर करायचा असेल तर समोर यायला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने क्रांती होते. विशेष म्हणजे महिला वरील विषयावर महिलांनीच बोलावे असे काही नाही पुरुषांनी देखील समोर यायला पाहिजे. त्यासाठी महिलांनी आपला उंबरठा ओलांडून छोटे मोठे व्यवसाय घर खर्चासाठी शिवणकाम सुरू केले तर महिलांची प्रगती होऊ शकते. त्यासाठी महिलांनी जे काही उत्पादन केले आहे ते चांगल्या प्रतीचे असले पाहिजे. त्या उत्पन्नाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यामुळे एखाद्या गावात महिला पुढे येत असतील तर खरी प्रगती तिथूनच होत असल्याचेही याप्रसंगी शिंदे यांनी सांगितले तसेच गावातील तंटे सामोपचाराने मिटवत असताना दुसरीकडे महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती ला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.
कार्यक्रमाचचे आयोजक, तंटामुक्त समिती अध्यक्ष, नितीन बनसोडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की हा उद्योग महात्मा गांधी तंटामुक्त समिती मुळेगाव यांच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी अनेकांचा हातभार लागला आहे. या उद्योगाच्या माध्यमातून अनेक महिला आत्मनिर्भर होऊन शिवणकामातून चार पैसे मिळवित असल्याचे समाधान असल्याचे सागितले.
यावेळी उपसरपंच शिवराज जाधव, ग्रामपंचायत सदस्य गणेश काकडे, किसन नागटिळक, श्रीशैल म्हेत्रे, बालाजी बनसोडे, बसवराज स्वामी, ग्रामपंचायत सदस्य, सीमा बनसोडे, भौरम्मा माळी, शिवगंगा वाघमारे, संध्या दुपारगुडे, फर्जना मुलाणी, माधुरी काकडे आकांक्षा गायकवाड,अरुण पाटील, अमृता बनसोडे, गुलाब शेख, ब्रम्हनाथ बनसोडे,महेश शेंडगे, आदी उपस्थित होते.