मुंबई - गणेश हिरवे
येथील ज्येष्ठ नागरिक भवन नेरुळ येथे स्वर्गीय कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने नेरुळ जेष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालय आणि अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८.१२.२०२२ रोजी त्यांना काव्य सुमनांची आदरांजली वाहण्यासाठी *स्मृतिगंध* कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पाडगावकरांच्या या भावगीतांवर तसेच कवितां वर आधारित कार्यक्रमात त्यांच्या कन्या श्रीमती अंजली दिलीप कुलकर्णी उपस्थित होत्या. आयस्कॉन चे अध्यक्ष श्रीयुत व्ही. के. भडाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात ललित पाठक, महादेव देवळे, उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वाती फडके, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी रणजीत दीक्षित, नंदलाल बॅनर्जी, प्रभाकर गुमास्ते, अजय माढेकर श्रीमती रजनी कलोसे, लक्ष्मण गावडे , गुप्ता ,अंकुश जांभळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मंगेश पाडगावकरांच्या जीवन चरित्राबरोबरच त्यांच्या हृद्य आठवणी जागवताना त्यांच्या सुविद्य कन्या श्रीमती अंजली कुलकर्णी यांनी अपरिचित गोष्टी सांगताना कार्यक्रमात रंगत आणली. तसेच पाडगावकरांचे भाचे डॉक्टर प्राध्यापक विलास उजगरे व कवियत्री मीनाक्षी तांडेल यांनी पाडगावकरांच्या सहवासाच्या दरम्यान खुललेली काव्य प्रतिभा या विषयावर अतिशय चिंतनशील माहिती पुरविली.
या कार्यक्रमाचे प्रायोजक आणि भूमिपुत्र सामाजिक प्रतिष्ठान नवी मुंबई संस्थेचे अध्यक्ष गज - आनन म्हात्रे यांनी पाडगावकरांच्या गीतांचा मागोवा घेताना *वात्रटिका* तसेच भावविभोर सुरेल गीता मागील प्रसंग उद्धृत केले आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.संस्थेचे कार्याध्यक्ष विकास साठे यांनी कार्यक्रमाविषयी माहिती देऊन सुरुवातीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
तसेच श्रीयुत प्रकाश लखापते, अध्यक्ष यांनी प्रास्ताविकात सविस्तर कार्यक्रमाची रुपरेखा विशद करुन आयोजनाचा उद्देश अधिक सुस्पष्ट केला. स्मृतिगंध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम परकाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश गायकवाड यांनी केले.
ग्रंथालयाच्या सचिव श्रीमती सीमा आगवणे आणि पदाधिकारी श्री विजय सावंत यांनी कार्यक्रमाचे नियोजन कुशलतेने करुन कार्यक्रम अधिक बहारदार केला.