आपल्या केलेल्या श्रमाचं, संस्काराचं ,कर्तव्याचं चीज झालं असं आई वडिलांना वाटण्या इतपात मुलांनी देखील सर्व गोष्टीची जाण ठेऊन खडतर परिस्थितीवर मात करत असं कर्तृत्व गाजवलं पाहिजे.
पशुपालन आणि उत्कृष्ठ शेती करीत असलेले माझे मित्र आदर्श शेतकरी फुलचिंचोलीचे धनाजी जाधव यांचा मुलगा नितीन जाधव हा नुकतेच पोलीस ट्रेनिंग संपवून पुणे ग्रामीणला रुजू झाला..
मित्रहो आई वडिलांना दुसरे काय हवे असते..मुलांना मोठे करण्यात त्याला वाढविणेत त्यांची पूर्ण हयात जाते.मुलांनी देखील कष्ट करून आई वडिलांच्या हातावरील फोडाची जाण ठेऊन असे कर्तृत्व गाजवून माता पित्याची शान मान उंचावली पाहिजे,त्यांची कॉलर टाईट केली पाहिजे.
माझा मुलगा अजिंक्यचा नितीन हा क्लासमेट असल्याने मी नितीनला लहान पनापासून ओळखतो.फुलचिंचोलीच्या जिल्हा परिषद शाळेचा नितीन हा विद्यार्थी आहे..मुलांमध्ये जिद्द असेलतर ते कसे चमकू शकतात याचे उदाहरण म्हणजे पोलीस झालेला हा नितीन आहे..त्या पाठीमागचे त्याचे कष्ट ,तपश्चर्यादेखील खूप मोठी आहे.. चार पाच वर्षांपासून घरापासून बाहेर परजिल्ह्यात खाजगी अकॅडमी मध्ये राहून रात्रीचा दिवस करून खेडेगावातल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील या पोराने सुयश संपादन केले आहे..नितीनचे वडिलांनी धनाजी काकांनी तेवढाच आपल्या मुलांवर मोठा विश्वास टाकून पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांसाठी त्याग केला,योगदान दिले त्यालाही खरेतर तोड नाही.नितीन ,त्याचे आईवडील ,कुटुंबीय यांना सलाम ,त्यांचे माझेतर्फे खूप अभिनंदन.
नितीनने पोलीस शिक्षण ट्रेनिंग संपल्यानंतर आपल्या डोक्यावरील शिरस्त्रांन ,साक्षात सोनेरी मुकुट काढून स्वतःचे वडिलांचे डोक्यावर घातलेला हा फोटो हा समस्त ग्रामीण वडिलांची शान मान वाढविणारा असाच आहे..
समस्त पालकांनी आणि इतर मुलांनी आदर्श आणि प्रेरणा घेण्यासारखी ही खरेतर घटना आहे..पुनश्च एकदा नितीनचे अभिनंदन आणि त्याला खूप शुभेच्छा
वडील आणि मुलाचा हा फोटो पाहून मलाही खूप छान वाटले,आनंद आणि अभिमान वाटला..ससॅल्युट
ॲड. विजयकुमार नागटिळक ,
सुस्ते ,ता.पंढरपूर , जि. सोलापूर .