सोलापूर प्रतिनिधी
शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे यांचा 15 डिसेंबर 2022 रोजी सोलापुरात महाप्रबोधन यात्रे अंतर्गत होणाऱ्या होणारी सभा रद्द करण्यात आली आहे अशी माहिती सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व शहर प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज )यांनी दिली आहे.
शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या महाप्रबोधन यात्रा अंतर्गत 15 डिसेंबर 2022 शनी गुरुवार रोजी सोलापुरात सुषमाताई अंधारे यांचे सभा आयोजित करण्यात आली होती.
परंतु सुषमाताई अंधारे यांची तब्येत बिघडल्या कारणाने त्यांचा सोलापूरचा दौरा रद्द केल्याचे माहिती शिवसेना भवनातून जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांना कळविले असल्या कारणाने पंधरा तारखेला अंधारे ताई यांचा होणारा सभा रद्द करण्यात आली आहे.
त्याचबरोबर सदर सभेच्या नियोजनाबाबत उद्या १०डिसेंबर 2022 शनिवार रोजी आयोजित करण्यात आलेले तातडीचीव महत्त्वाची बैठक रद्द करण्यात आली आहे असे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे साहेब व शहर प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज)नी कळविले आहे.
तरी याची सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व नागरिक बंधू भगिनींनी नोंद घ्यावी,असे हि कारमपुरी म्हणाले.