सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका , जिल्हा क्रीडा कार्यालय व आट्या पाट्या असोसिएशन आँफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कुमठा नाका येथील क्रीडा संकुल मैदानावर घेण्यात आलेल्या शहरस्तरीय आट्या पाट्या स्पर्धेत नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षे वयोगटातील मुलांचा संघाने विजेता ठरला. या संघाची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सुदीप हडलगी ,आदित्य मोहोरकर , अनिकेत कदम, ऋषिकेश कदम, राकेश पातूर , राहुल पवार ,ऋषिकेश शिरसिल्ला ,नागेश राऊल , अभिषेक राठोड , आकाश मायाचारी, रागवय्या बोड्डू , पवन राऊळ या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक विठ्ठल कुंभार , अशोक पाटील ,सुरेश बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार ,प्राचार्य विजयकुमार हुल्ले,पर्यवेक्षक गोरीशंकर आंळगे व प्राध्यापक वृंदानी अभिनंदन केले.