वर्धा प्रतिनिधी उदय वाघवणकर
भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली यांनी मुंबई पश्चिम उपनगर जिल्हाअंतर्गत जोगेश्वरीतील ज्येष्ठ पत्रकार शरद बनसोडे यांची निवड केली आहे.
मुंबई अकादमीचे महासचिव ज्येष्ठ पत्रकार दत्ताराम घूगे यांनी शरद बनसोडे यांना नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.शरद बनसोडे हे ज्येष्ठ पत्रकार, वृत्तपत्रलेखक, सामाजिक कार्यकर्ते म्हणून गेली ३५ वर्षे कार्यरत आहे.विशेषमालावार्ताचे ते संपादक असून आतापर्यंत त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत भारतीय दलित साहित्य अकादमीने त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांचे याबाबत अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.