जयराम घाडगे सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील वानलेसवाडी येथील हायस्कूल & जुनिअर कॉलेज वानलेसवाडी येथे आज दि. 3 डिसेंबर 2022 रोजी शाळेमध्ये आठवडी बाजार भरवण्यात आला .
या कार्यक्रमासाठी वाळवा तालुका बौद्ध सोसायटी ,वाळवा या संस्थेचे विद्यमान सचिव मा .विवेक भाऊ धनवडे साहेब ,शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक मा. बिराजदार सर तसेच वानलेसवाडीचे, माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते नारायण बेळे साहेब हे उपस्थित होते. परिसरातील सर्व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इयत्ता तिसरी ते सातवी मधील विद्यार्थी विक्रेता म्हणून 120 सहभाग घेतला . आठवडी बाजार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री इंगोले एस पी यांनी केले .त्याचबरोबर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .विद्यार्थ्यांनी बाजाराचा आनंद त्याचबरोबर होणारा नफा तोटा गणिती क्रिया बेरीज वजाबाकी पैशाची देवाणघेवाण या बाजारातून विद्यार्थ्यांना समजले.
याचे संपूर्ण नियोजन आमच्या शाळेचे मुख्याध्यापक ,मार्गदर्शक आदरणीय बिराजदार सर यांनी केले .पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी पालक यांचे मनःपूर्वक आभार .