सोलापूर प्रतिनिधी
श्री. बृहन्मठ होटगी शिक्षण संस्था संचलित,एस.व्ही. सी.एस.प्रशालेत थोर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिन संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य श्री.होटगीश्वर महा स्वामीजींच्या कृपा आशीर्वादाने करण्यात आले.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक मा श्री. राजकुमार भोरे सर होते. प्रशालेतील जेष्ठ गणित शिक्षक शेकप्पा तेग्गेळ्ळी यांच्या शुभहस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तदनंतर प्रशालेतील इयत्ता दहावी ड मधील कु. आकांक्षा रोडगीकर व पौर्णिमा कोनाळी या विद्यार्थ्यांनी गणित प्रतिज्ञा सादर केल्या. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उप मुख्याध्यापक नंदकुमार धाये उपस्थित होते.
या प्रसंगी प्रशालेतील गणित सहशिक्षिका सुनिता कलशेट्टी व शेकप्पा तेग्गेळ्ळी यांनी प्रसंगानुरूप मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध पोस्टरद्वारे गणिताच्या क्लुप्त्या , सूत्रे आदीची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री.राजकुमार भोरे सरांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, जगातील सर्वात उत्तम खेळ म्हणजे गणित परंतु त्या वर प्रेम केल्यास त्याच्या सारखा उत्तम मित्र कोणीही नाही. तसेच गणित म्हणजे विज्ञानाच्या दरवाज्याची गुरू किल्ली आहे. असेही प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास प्रशालेचे पर्यवेक्षक सिद्रामप्पा उपासे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांक्षा रोडगीकर यांनी तर आभार प्रदर्शन सुमन बिराजदार मॅडम यांनी केले.