पंढरपूर प्रतिनिधी
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी पंढरपुरात अभिजित पाटील यांच्या कार्यालयास दिली सदिच्छा भेट आणि आबांच्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले.
अभिजित पाटील यांनी कोरोना काळात करण्यात आलेल्या कार्याचे लंके यांनी कौतुक केले. तसेच सहकार क्षेत्रात अतिशय जिद्दीने सुरू असलेली वाटचाल आश्वासक असून निरंतर कार्य सुरू ठेवण्यासाठी लंके यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
आ.निलेश लंके हे सातत्याने कार्यमग्न असणाऱ्या नेतृत्वाच्या भेटीने आनंद झाला.असे अभिजित पाटील यांनी तेज न्यूजला सांगितले.यावेळी युवक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.