भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील रविवार पेठेतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भागवत एकादशी निमित्त डंबाळ कलेक्शनचे मालक चैतन्य डंबाळ यांच्या हस्ते श्री उत्सव मूर्तिला अभिषेक करून महापूजा करण्यात आली.
यावेळी मनोज डंबाळ, आनंद देशपांडे, प्रशांत माळवदे,सुधीर गांधी,विभुते आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.


