सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका,जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर व कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी इनडोअर स्टेडीयम येथे आयोजित शहर स्तरीय कॅरम स्पर्धेत निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेच्या १४ वर्षे वयोगटातील मुले व मुली,१७ वर्षे वयोगटातील मुले व मुली व १९ वर्षे वयोगटातील मुले व मुली या सर्व गटातील १३ खेळाडूंनी विजय मिळवत वर्चस्व कायम राखले तसेच शहरस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रशालेतील ज्ञानेश्वर दोरकर या खेळाडूंने ग्रीको रोमन या कुस्ती क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. या सर्व खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
चेतन येमुल,श्रीकांत दूध्याल, सर्मथ कोट्टलगी, अंकिता वन्नम,लोकेश वंगारी,रूपा गडगी, श्रीविनायक हतगल,दिपक धोत्रे, प्रतिक्षा लिंगाबत्तीन,सुप्रिया कोटलगी, सौभाग्य बहीरगुंड, चैतन्या उडता,अमृता मायकुंटे, ज्ञानेश्वर दोरकर या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक विठ्ठल कुंभार, अशोक पाटील,विश्वाराध्य मठपती, सुरेश बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार, मुख्याध्यापकद्वय विजयकुमार हुल्ले, रविशंकर कुंभार,पर्यवेक्षक गौरीशंकर आंळगे व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले.