पंढरपूर प्रतिनिधी
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथे बाजार डे चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शेतामध्ये पिकणारा मालक प्रत्यक्ष बाजारामध्ये विकण्यासाठी आणला होता. विद्यार्थ्यांना पिकणारा माल विकता यावा यासाठी त्यांना व्यवहार ज्ञान आवश्यक असते आज शिवरत्न पब्लिक स्कूलमध्ये बाजार डे चे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानाला चालना देण्याचे काम करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपल्या शेतामध्ये विकणारा भाजीपाला कडधान्य ,विविध फळे, पालेभाज्या विकण्यासाठी बाजारात आणल्या होत्या. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असणारे कौशल्य दाखवून पाणीपुरी, भेळ, पुरी भाजी ,बिर्याणी, वडापाव ,इडली ,डोसा, चिवडा ,लाडू असे विविध पदार्थ बनवून बाजारामध्ये विकण्यासाठी आणले होते. ग्रामस्थांनी त्या सर्व पदार्थांचा भरपूर आस्वाद घेतला .विद्यार्थ्यांना शैक्षणिक बरोबरच बाजारामध्ये आपल्या वस्तू विकण्याचे ज्ञान अवगत होणे गरजेचे होते. या उद्देशाने सदर बाजार डीचे आयोजन करण्यात आले असल्याचे संस्थापक अध्यक्ष उपसरपंच गणपत मोरे यांनी सांगितले .
बाजारडेचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच वंदना मोहन बागल यांच्या हस्ते करून करण्यात आले. यावेळी उद्योगपती पद्माकर बागल, संचालक मोहन बागल ,भाजपचे उपाध्यक्ष गणेश बागल ,युवा नेते प्रदीप बागल ,गणेश मेडिकल ,हनुमंत बागल अनिल आप्पा बागल , गणेश फाटे, उद्धव बागल ,प्रमोद कदम ,संजय खवनकर, औदुंबर कांबळे, दत्ता बागल, गणेश पवार, सागर नागणे,सोमनाथ भुईटे ,राजेंद्र मोलाने, दीपक देशमुख आदी उपस्थित होते.
बाजार डे साठी राष्ट्रवादीचे उद्योग व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश दादा फाटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी काका बागल , संपादक शिवाजीराव शिंदे, शेतकरी नेते समाधान फाटे, उद्योजक सिताराम बापू बागल, जेष्ठ नेते गोरख नाना बागल,स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते रणजीत बागल , माजी सरपंच महादेव फाटे,उद्योगपती पप्पू पाटील,यशवंत बागल, शरद बागल ,अजय मोरे, व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता उपस्थित सर्व मान्यवरांचे व ग्रामस्थांचे गणपत मोरे यांनी आभार मानले.