जळगाव प्रतिनिधी
डॉ. एपीजे अब्दुल कलाम सैटेलाइट लॉन्च व्हीकल मिशन - २०२३ जगातील सर्वात मोठी भारतीय विद्यार्थ्यांची मिशन विद्यार्थी बनविणार १५० पिको उपग्रह आणि परत वापरता येणारे रॉकेट प्रवेश घेण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर
डॉ. एपीजे अब्दुल कलाम सैटेलाइट लॉन्च व्हीकल मिशन - २०२३ हा प्रकल्प भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम सर यांचे भारताचे स्वप्न पूर्ती साठी चे एक पाऊल असून २०२० २०२१ साली केलेल्या डॉ एपीजे अब्दुल कलाम पेलोड qubies चालेंज प्रकल्पाचा पुढील टप्पा आहे. हा प्रकल्प सरळ हाऊस • ऑफ कलाम यांचे संस्था डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांचे द्वारा राबविला जात आहे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम सैटेलाइट लॉन्च व्हीकल मिशन- २०२३ या प्रकल्पात विद्यार्थ्यांचे उपग्रह बनविण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण होईल तसेच प्रत्यक्ष पिको उपग्रह बनविण्याची कार्यशाळा पुणे आणि नागपूर येथे घेण्यात येईल. उपग्रह बनविण्याच्या कार्यशाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. ऑनलाईन प्रशिक्षण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची ऑल इंडिया स्तरावर एक परीक्षा सुद्धा होईल. या परीक्षेत प्रथम मेरिट मध्ये येणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष परत वापरात येणारे रॉकेट बनविण्याची संधी मिळेल. या रॉकेट चे वजन २२.५ किग्रॅ असेल आणि उपग्रह त्यात फिट केल्या नंतर रॉकेट चे वजन ४५ ते ६० किग्रॅ असेल. सदर रॉकेट १९ फेब्रुवारी २०२३ रोजी तामिळनाडू मधील कांचीपुरम जवळील पट्टीपुरम येथून अवकाशात सोडले जाईल. रॅकेट प्रक्षेपित करण्यासाठी सर्व परवानग्या केंद्र आणि राज्य सरकार कडून मिळविण्यात आल्या आहेत. सदर चे रॉकेट उपग्रह अवकाशात सोडल्या नंतर पॅराशूट चे साहाय्याने परत जमिनीवर लॅन्ड करेल आणि पुढील मिशन साठी परत वापरता येईल. असा प्रयोग अमेरिकेत एलोन मास्क यांनी केला होता. जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांनी १५० पिको उपग्रह सोबत असे रॉकेट बनविण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याने १९ फेब्रुवारी २०२३ रोजी हा भारतीय विद्यार्थ्यां जागतिक विक्रम, आशिया विक्रम, इंडिया विक्रम, अस्सिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड असे विक्रम स्थापित होतील. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास वरील ४ प्रशस्तिपत्रे दिले जातील. अश्या प्रयोगाने भारतीय विद्यार्थी अवकाश क्षेत्रात भारताचे नाव अभिमानाने नोंदवतील आणि भविष्यात अश्या मिशन मधून डॉ. कलाम यांचे सारखे शास्त्रज्ञ तयार होण्यास आणि नवीन डेव्हलपर भारत तयार होण्यास हातभार लागेल.
या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांचे विविध गट बनविण्यात आलेले आहेत. ५ वि ते १० वि. ११ वि १२ वि. पदवीधर. आणि पॉलीटेकनिक आणि इंजिनीरिंग शेवटच्या टप्प्यासाठी गटानुसार ऑनलाईन ऑल इंडिया टेस्ट नुसार सर्व मिळून १०० विद्यार्थ्यांची रॉकेट बनविण्यासाठी निवड केली जाईल. रॉकेट बनविणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र कुठलेही प्रशस्तीपत्र मिळणार नाही. सर्व सहभागी विद्यार्थ्यास एकाच प्रकारचे प्रशस्तिपत्रे मिळतील. महाराष्ट्र मधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण दरम्यान भाषेची अडचण येऊ नये म्हणून खास मराठी मधून येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच कार्यशाळेत सुद्धा मराठी आणि हिंदी मदतनीस सदर प्रकल्पात विद्यार्थ्यांना उपग्रह बनविण्यात सहकार्य करतील. महाराष्ट्र मध्ये हा प्रकल्प मनीषा ताई चौधरी महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशन यांचे नेतृत्वात होत असून अधिक माहिती साठी ८३२ ९७० ७०४२, ९१६७१२८९०५ सहभाग नोंदविण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२३ आहे. या नंबर वर संपर्क करावा.
अधिक माहितीसाठी -
E-Mail contact Chouseofhalamong Wehr www.apjahdantoundation.org www.abokkalam.org B. Dr APJ Abdul Kalam International Roundation Tuitter Dr API About Kalam international Foundation
1.HOUSE OF KALAM,
#12/7, Mosque Street RAMESWARAM 623 526. Rammad Dist. Tamil Nadu, INDIA
APJABDULKALAM INTERNATIONAL FOUNDATION
Ph : 04573-221100, 221366 +91 96006 647441 99404 88627