सोलापूर प्रतिनिधी
शेळगी येथील समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाची सभा उत्साहात पार पडली.
सभेत सन २०२२-२५ या तीन वर्षांकरिता नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.बाबुराव नरोणे (अध्यक्ष), अशोक खानापुरे (उपाध्यक्ष),मन्मथ कोनापुरे (सचिव), शिवलिंग शाबादे ( सहसचिव), चंद्रकांत बिराजदार ( खजिनदार), चंद्रकांत रमणशेट्टी, महादेव पाटील,अप्पाराव विभुते, भीमाशंकर पटणे, सुरेश तानवडे, सुर्यकांत निरगुडे, मल्लिनाथ बताले,बसवणप्पा गुंडू, गंगाबाई गिन्ने,शालन गडदे (सर्व सदस्य)
सर्व नूतन कार्यकारिणी सदस्यांची माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, परिवहन समितीचे माजी सभापती महादेव पाटील यांच्या हस्ते सत्कार करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आली. या
प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्याबाबत व विविध उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. ज्येष्ठांसाठी ग्रंथालय स्थापना करुन विविध ग्रंथ गोळा करण्यात आले.