सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर भारत स्काऊट आणि गाईड शहर जिल्हा कार्यालयाच्या जिल्हा मुख्य आयुक्तपदी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय जावीर यांची निवड करण्यात आली.राज्य स्काऊट गाईडच्या कार्यालयाकडून निवडीचे पत्र जिल्हा कार्यालयास प्राप्त झाले.प्राथमिक शिक्षणाधिकारी हे स्काऊट गाईडचे पदसिद्ध मुख्य आयुक्त असतात.सध्या मुख्य आयुक्तपदी नसल्याने हे पद रिक्त होते.कार्यालयीन कामकाज सुरळीत चालू राहण्यासाठी राज्य स्काऊट गाईड कार्यालयामार्फत शिक्षणाधिकारी जावीर यांची नियुक्ती केल्याने शिक्षण क्षेत्रात कौतुक होत आहे.
सध्या बाळे येथे सुरू असलेल्या निवासी स्काऊट मास्टर, कब मास्टर, गाईड कॅप्टन, फ्लॉक लिडर यांचे प्राथमिक प्रशिक्षण शिबिरास नूतन आयुक्त जावीर भेट दिले.याप्रंसगी स्काऊट गाईड शिक्षकांच्यावतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आले. यावेळी माजी शिक्षणाधिकारी विद्याधर जगताप, जिल्हा स्काऊट संघटक श्रीधर मोरे, जिल्हा गाईड संघटक अनुसया शिरसाठ, कार्यालयीन कर्मचारी विश्वास लिंगराज, रिजवाना पठाण,बंडू बंडगर आदी उपस्थित होते.