अकोला जिल्हा, पातूर, वडेगाव, धानेगाव प्रतिनिधी
'भारत जोडो" पदयात्रेत सोलापूर शहर व जिल्हा कॉंग्रेसचे जवळपास बारा हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे.प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार, शेतकरी व कामगार विरोधी धोरणे, जातीवाद, विरोधात आवाज बुलंद केला.
महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी व कामगार विरोधी धोरणे, जातीवाद याविरोधात, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाहीच्या रक्षणासाठी, केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या "भारत जोडो" पदयात्रेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्ह्यातील पातूर, वडेगाव, धानेगाव येथील पदयात्रेत सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसचे जवळपास बारा हजार पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वरील मुद्याविरोधात आवाज बुलंद केला.