सोलापुर प्रतिनिधी
शिवसेना सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य, दक्षिण ग्रामीण (हद्दवाढ) व अक्कलकोट, विधानसभा मतदार संघ या विभागांचे तातडीची बैठक सोमवार दि. १४/११/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या अध्यक्षतेखाली व शहरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) आणि सर्व उपजिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत होणार आहे.
सदर बैठकीत दि. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई येथील ‘मातोश्री’बंगला येथे सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या झालेल्या आढावा बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी केलेले आदेशात्मक आवाहन व शिवसेना नेते व खासदार संजयजी राऊत, शिवसेना सचिव मिलींदजी नार्वेकर, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते व आमदार भास्करजी जाधव, शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे, शिवसेना उपनेते रविंद्रजी वायकर यांनी सोलापूर लोकसभा मतदार संघातील जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, माजी मंत्री, माजी आमदार, माजी जिल्हाप्रमुख यांना संघटनात्मक केलेले मार्गदर्शन या बैठकीत माहिती देण्यात येणार आहे.
सदर बैठक जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या आदेशानुसार घेणात येणाऱ्या बैठकीस सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, शिवसेना अंगीकृत महिला आघाडी, युवा सेना, रिक्षा सेना, कामगार सेना, विद्यार्थी सेना आणि इतर सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी यांनी सदर बैठकीत न चुकता वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व महानगरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी केले.