पंढरपूर प्रतिनिधी विनोद पोतदार
अब्दुल हमीद याकुब शेख पोलीस उप निरीक्षक सोलापूर ग्रामीण यांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह" प्रदान मा. रजनिश सेठ, पोलीस महासंचालक यांच्या आदेशाने पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या हस्ते व अप्पर पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव, पंढरपूरचे पोलीस उप अधीक्षक विक्रम कदम यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे गुन्हे शाखेच्या बैठकीत प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी संपूर्ण जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल व प्रशंसनीय सेवेसाठीअ. हमीद शेख यांचा गौरव करण्यात आला ,यामुळे पंढरपूर शहर पोलिस, तालुका पोलिस व ग्रामीण पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला.