मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
साप्ताहिक भगवे वादळच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार शरद नामदेव बनसोडे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील दखल घेऊन साप्ताहिक भगवे वादळच्या टीमने त्यांना प्रबोधनकार ठाकरे उत्कृष्ट पत्रकारिता गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे माजी आमदार बाबूराव माने, माजी महापौर स्नेहल आंबेकर, कामगार नेते व मुंबई मित्रचे संपादक अभिजीत राणे, दैनिक मुंबई चौफेरचे संपादक प्रफुल्ल फडके यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.याआधीही बनसोडे यांना विविध पुरस्कार मिळालेले असून ते एल आय सी मध्ये कामाला आहेत.