मुंबई प्रतिनिधी - गुरुनाथ तिरपणकर
महाराष्ट्रातील मुक्त पत्रकारांसाठी कार्यरत असणा-या महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघातील सर्व सभासंदाच्या मुंबई येथील सर्व साधारण सभेत निवड झालेल्या १५ सदस्यांची सभा नुकताच मेघवाडी,लालबाग,मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.
या सभेत सन २०२२-२०२४ साठी पदनिहाय कार्यकारिणी निवडण्यात आली.त्या अनुषंगाने श्री.प्रकाश वसंत पाटकर यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
तसेच उपाध्यक्ष-पंढरीनाथ भिमाजी तामोरे,प्रमुख कार्यवाह-अॅड.सुनिल भार्गवराम शिर्के,संयुक्त कार्यवाह-१)डाॅ.सुर्यभान श्रीराम डोंगरे २) सौ.छाया सिताराम गचके,खजिनदार-अनिल सखाराम पंडीत,हिशोब तपासनीस-डाॅ.एकनाथ ज्ञानदेव नलावडे,कार्यकारी सदस्य म्हणून प्रकाश सखाराम तोडणकर,अशोक विठ्ठल भोसले,अण्णासाहेब एकनाथ आहेर,जगन्नाथ गोपाळ कामत,शशिकांत केरु तुळवे,शरद दामोदर गायकवाड,शशिकांत राजाराम सावंत,गुरुनाथ मधुसूदन तिरपणकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी सर्व पदाधिका-यांनी सभेस मार्गदर्शन व संबोधित केले.व आपली ओळख व कार्यप्रणाली विशद केली.आगामी काळात विविध उपक्रम यशस्वीपणे राबवून संघाला प्रगतीपथावर नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. नवनियुक्तत कार्यकारिणीची सभा खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली.
यावेळी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाच्या अधिपत्याखाली प्रकाशित वृत्तपत्र,पाक्षिक दीपस्तंभाचे संपादक प्रभाकर (आप्पा) तोडणकर यांनी सर्व पदाधिका-यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.शेवटी अल्पोपहाराने सभेची सांगता झाली.