अकलूज प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश भाजप अल्पसंख्याक मोर्चा ची बैठक अकलूज या ठिकाणी धन्यवाद मोदीजीच्या या अभियानची माहिती देण्यात आली. भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा सोलापूर जिल्हा च्या वतीने व तालुका माळशिरस च्या वतीने अकलूज नॉलेज सिटी येथे बैठकीचा आयोजित करण्यात आले होते.
त्या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हाजी इजाज भाई देशमुख, आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस भारतीय जनता पार्टी धैर्यशील मोहिते-पाटील, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे महामंत्री अतिक भाई खान, सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुखतार भाई कोरबू तालुक्याचे अध्यक्ष रशीद भाई मुलांनी सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक संघटन सरचिटणीस लुकमान भाई इनामदार , अकलूज शहराध्यक्ष असलम सय्यद हमीद मुलाणी जमीर चौधरी असलम सय्यद अब्दुल हमीद सय्यद व मोर्चाचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये धन्यवाद मोदीजी अभियानाचा बैठक संपन्न झाली.
सर्वांचं जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबू यांनी स्वागत करून, आभार मानले. यावेळी अल्पसंख्यांक मोर्चाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.