सोलापूर प्रतिनिधी
निलम नगर येथील हनुमान मंदीरात नेताजी संस्थेच्यावतीने दिपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही दिवाळी पाडव्याच्या सायंकाळी हनुमान मंदिर व परिसरात हजारो दिवे लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला.संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार व ललिता कुंभार यांच्या हस्ते हनुमान मंदीरातील मुर्तीची विधीवत पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष धुमशेट्टी, प्राचार्य विजयकुमार हुल्ले, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आंळगे आदी उपस्थित होते. जय हनुमान, शुभ-लाभ, स्वस्तिक, पणत्या, चक्र अशा विविध आकारात पणत्या लावण्यात आले होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विठ्ठल कुंभार, लक्ष्मीकांत त्रिशुले, धर्मराज बळ्ळारी,विश्वाराध्य मठपती, शैलेश स्वामी, अशोक पाटील,सिद्धाराम कुंभार, विनायक कोरे, म्हेत्रे, राजेंद्र मुलगे, शितल पाटील,प्रा.करजगी, प्रशांत पटणे यांच्यासह कुंभार परिवारातील सर्व सदस्य परिश्रम घेतले. निलम नगर परिसरातील भाविक दिपोत्सव कार्यक्रमाचा लाभ घेतला. शाळेतील कला, क्रीडा, स्काऊट गाईड विभागातील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केले होते.
समृद्धी आणि समाधानसाठी दिपोत्सव
निलम नगर परिसरातील हनुमान भाविक भक्तांना दिपावली सण सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे व समाधानाचे जाण्यासाठी दरवर्षी नेताजी शिक्षण संस्थेच्यावतीने दिपोत्सव कार्यक्रम घेत असल्याचे माहिती अण्णाराव कुंभार यांनी सांगितले.