सोलापूर प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील जनसेवा हीच ईश्वर सेवा फाऊंडेशन तर्फे श्री सोमेश्वर प्रशालेतील प्रज्ञाशोध या शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या गरीब हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना अथर्वश्री या शिष्यवृत्ती पुस्तकाचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी प्रशालेतील सोमलिंग मलकारी कोरे या विद्यार्थ्यांने तालुका व जिल्हा विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल,सहशिक्षक सूरज शेजाळे यांचेही विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक आल्याबद्दल तसेच लिंगराज शिवयोगी यांचे शाळेच्या नूतन मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल शाल संस्थेचे मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आले. यावेळी शिवयोगी म्हणाले,विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
संस्था सहसचिव अमोघ पुजारी म्हणाले, या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी जन सेवा हिच ईश्वर सेवा अशी संघटना बनवून समाज हितासाठी सतत उपक्रम राबवित असल्याचे सांगितले.गावातील हुशार, गरीब , होतकरू तसेच गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तन-मन-धनाने मदत करणार असल्याचे माहिती संघटना अध्यक्ष राघवेंद्र पाटील यांनी सांगितले.
सूत्रसंचालन श्री बिराजदार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री हिरेमठ सरांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय ममदापुरे, श्रीकांत भरले, सुभाष डोगे, परमेश्वर कुलकर्णी, स्वराज्य रोणे, महेश अवताडे, गुरुराज पाटील, प्रदीप पाटील, सिद्धारूढ पाटील यांसह सर्व विद्यार्थी व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर बिराजदार यांनी केले तर विवेकानंद हिरेमठ यांनी आभार मानले.