सोलापूर प्रतिनिधी
दिनांक 20.10.2022 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून वनपरिक्षेत्र सोलापूर अंतर्गत नियतक्षेत्र सोलापूर मधील मौजे बेलाटी येथील शेतामध्ये काही लोक वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उददेशाने जाळे लावून बसले असलेबाबत ची गुप्त माहितीच्या आधारे श्री.एल.ए.आवारे, सहाय्यक वनसंरक्षक रोहयो सोलापूर, श्री.डी.पी.खलाने वनपरिक्षेत्र अधिकारी, रोहयो व त्यांचे अधिनस्त असलेले क्षेत्रीय कर्मचारी यांचसह घटनास्थळी पोहोचले असता श्री. महेश जनार्धन मसाळ यांचे गट नं. 66 मध्ये तुरीच्या शेतामध्ये 4 इसम नाम 1.)श्री.संतोष सोपान माळी वय वर्ष 25 रा. कुरणवाडी ता. अंबेजोगाई जि. बीड, 2.) श्री. नंदकुमार बाबुराव बर्ड वय वर्ष 27 रा. संजयनगर ता. गेवराई जि. बीड, 3.) श्री. सचिन सुभाष पवार वय वर्ष 17 रा.कुरणवाडी ता. अंबेजोगाई जि. बीड 4.) श्री. सर्जेराव सोपान माळी वय वर्ष रा.कुरणवाडी ता. अंबेजोगाई जि. बीड हे तितर या वन्यपक्ष्याची शिकार करणेच्या हेतून जाळी लावून बसल्याचे निदर्शनास आले.
सदरच्या घटनास्थळावरून खालील आरोपी यांचेकडून सदरचा मुददेमाल जप्त करणेत आला. 1.)श्री.संतोष सोपान माळी यांचेकडून 1 पिंजरा, 2 तितर पक्षी जप्त करणेत आले. 2.) श्री. नंदकुमार बाबुराव बर्डे यांचेकडून 2तितर पक्षी, 1 पिंजरा व 1 Redmi कंपनीचा मोबाईल जप्त करणेत आले. 3)श्री. सचिन सुभाष पवार यांचेकडून 2 तितर पक्षी, 1 जाळी व 1 पिंजरा जप्त करणेत आले. 4.) श्री. सर्जेराव सोपान माळी यांचेकडून 1 तितर व 1 पिंजरा असा (एकुण 7 तितर पक्षी, 3 पिंजरे, 1 Redmi कंपनीचा मोबाईल, जाळी) मुददेमाल जप्त केला.
सदर प्रकरणामधील आरोपी ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांचे विरूध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 2(16), 2(36), 9, 39 R/W 57,50,51 अन्वये प्राथमिक गुन्हा क्रमांक WL31/2022-23, दिनांक 20.10.2022 सदर रोजी गुन्हा दाखल करणेत आला.
सदर प्रकरणातील वन्यपक्षी तितर हा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 मधील अनुसूची 4 मध्ये समाविष्ठ आहे. सदर आरोपीने तितर वन्यपक्षी यांचे शिकार केलेली असून, त्यांना खाण्याच्या उददेशाने जवळ बाळगणे हा अतिशय गंभिर अपराध केलेला आहे.
सदरची कारवाई ही मा.श्री. डी. एम. पाटील उपवनसंरक्षक सोलापूर, श्री. एल.ए. आवारे सहा.वनसंरक्षक (रो.ह.यो) सोलापूर, यांचे मार्गदर्शनाखाली श्री.डी.पी.खलाने वनपरिक्षेत्र अधिकारी, रोहयो सोलापूर, श्री. एस.बी.कुताटे वनपाल सोलापूर, श्रीमती वाय. के. अदलिंगे वनरक्षक सोलापूर, श्रीमती ए.एस. शिंदे वनरक्षक गंगाधर कणबस, श्री. टी.एम.बादणे वनरक्षक मंद्रुप, श्री. जी.एन. विभुते वनरक्षक वागदरी यांचे पथकाने कारवाई पुर्ण केली. तसेच सदर कार्यवाही करिता नेचर कॉन्झरवेशन सोलापूर या अशासकीय संस्थेच्या वन्यप्रेमी सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर प्रकरणाचा पुढील तपास श्री.डी.पी.खलाने वनपरिक्षेत्र अधिकारी, रोहयो सोलापूरहे करीत आहेत.