मायणी प्रतिनिधी
वन्यजीव सप्ताह निमित्त मायणी अभयारण्य येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम करण्यात आला याप्रसंगी वन्य जीवांचे महत्त्व त्यांचे संरक्षण यासाठी अनेकांनी मनोगत व्यक्त केले यावेळेस विभागांमधून अनेक शाळेने सहभाग घेऊन विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक मायणी चांदणी चौक मधून अभयारण्यापर्यंत वन्यजीव सप्ताह घोषणा देत फेरी काढण्यात आली व सांस्कृतिक कला कार्यक्रमामधून नाटिका गायन पोवाडा यामधून प्राण्यांच्या विषयी जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमास अनेक शाळांनी भाग घेतला कार्यक्रमाप्रसंगी ज्यांनी संकटा मध्ये अनेक प्राण्यांना जीवनदान दिले अशा वन्यप्रेमींचे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले करण्यात आले त्याचबरोबर मायणी पक्षी आश्रयस्थान (अभयारण्य) याला कंजर्वेशन करण्यात आले केंद्रीय दर्जा देण्यात आला यावेळेस महत्वपूर्ण बातमी साठा प्राणी पक्षी यांच्या विषयी माहिती वरिष्ठ फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवून सहकार्य केले फॉरेस्ट विषयी कोणत्याही कार्यक्रमात सक्रिय राहणारे पत्रकार अंकुश चव्हाण सर यांना पारितोषिक सन्मान देऊन सत्कार करण्यात आले
वनपरिक्षेत्र वडूज च्या वतीने मायणी वनसंवर्धन क्षेत्रात घेण्यात आलेल्या वन्यजीव सप्ताह निमित्त वनविभागाचे सातारा जिल्हा उपनिरीक्षक महादेव मोहिते, यांचे शुभहस्ते व सामाजिक वनीकरण विभाग सातारचे विभागीय वनाधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे ,सहाय्यक व रक्षक (रोहयो व वन्यजीव) सातारा रेश्मा होरकाटे, (रोहयो व वन्यजीव ) सातारा. वनपरिक्षेत्र वडूज च्या शितल फुंदे , अर्जुन गमरे, वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण विभाग वडूज खटाव तहसीलदार किरण जमदाडे, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व पत्रकार सहाय्यक पोलीस निरीक्षक वडूज मालोजीराजे देशमुख, मायणी पोलीस उपनिरीक्षक , शितल पालेकर निसर्ग प्राणी पक्षी मित्र यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.