पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील गणेशोत्सव मंडळात अत्यंत लोकप्रिय नांव असलेले, समाजसेवक संजय ननवरे यांनी शेवटच्या दिवशी आणखी कमाल केली आहे. वीरमर्द अनिलराज डोंबे गणेशोत्सव तरुण मंडळास तब्बल १५ ढोलांची गिफ्ट दिली आहे. यामुळे या तरुण मंडळातील कार्यकर्ते जाम खुश झाले आहेत.
पंढरपूर शहरात सुमारे ९० गणेशोत्सव मंडळांनी, श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली होती. यंदाच्या वर्षी समाजसेवक संजय बाबा ननवरे यांचा भाव वधारला आहे. सुमारे ५५ गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्याकडून श्रीगणेशाची पूजा करून घेतली आहे. दहा दिवसात ५५ सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तीची आरती त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
गुरुवारी गणेश उत्सवाच्या अखेरच्या दिवशी, त्यांनी वीरमर्द अनिलराज डोंबे तरुण मंडळाच्या श्रीगणेशाची आरती केली. या मंडळाचे झांज पथक अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे. मंडळातील काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे ढोल घेऊन देण्याचा आग्रह धरला. यावर तातडीने त्यांनी १५ ढोल खरेदी केले. हे ढोल या तरुण मंडळाच्या हाती सुपूर्द करण्यात आले. यावेळी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सन्मान केला. याचप्रकारे दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणारे समाजसेवक संजय ननवरे यांनी यापूर्वी अनेक मंडळांना सहकार्य केले आहे. यामुळेच अनेक गणेशोत्सव मंडळाचे त्यांच्यावर अतूट प्रेम आहे. दहा दिवसात ५५ गणेश मूर्तींची आरती करण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे.
संजय ननवरे हे शहरातील अत्यंत लोकप्रिय समाजसेवक आहेत. कोरोना काळापासून त्यांचा परिचय सर्वसामान्य जनतेलाही झाला आहे. गरजवंताच्या प्रत्येक गरजेला धावून जाणे, हे त्यांच्या स्वभावाचे खास वैशिष्ट्य आहे. यामुळेच यावर्षीच्या गणेश उत्सव काळात त्यांच्याकडे मंडळांची रीघ लागली आहे.