पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील झेंडे गल्ली या परिसरामध्ये पवार हॉस्पिटलच्या बोळामध्ये ड्रेनेज चेंबर चे घाण पाणी येत असल्याची नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे .तरी तेथील राहणाऱ्या महिला नागरिकांनी वारंवार नगरसेवकांना तक्रार देऊनही नगरसेवक दखल घेत नाही नगरपालिका पण दखल घेत नसल्याची नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
अशातच पंढरपुरातील समाजसेवक संजय बाबा ननवरे यांना एका वृद्ध महिलेने फोन केला असता समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी तात्काळ त्या जागेवरती भेट देऊन आमदार समाधान दादा आवताडे व नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले असता प्रश्न त्वरित सोडवला व अधिकार्याकडून संजय बाबा ननवरे यांना लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन पण दिले तेथील सर्व नागरिकांमधून समाजसेवक संजय बाबा ननवरे यांचे कौतुक होताना दिसून येत आहे