पंढरपूर प्रतिनिधी
बँक ऑफ महाराष्ट्र च्या विविध योजनांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अ.भा. ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी केले.
ते बँकेच्या ८८व्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर शाखेतर्फे आयोजित ग्राहक मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.यावेळी ग्राहक पंचायतीचे तालुकाअध्यक्ष विनय उपाध्ये, संघटक महेश भोसले उपस्थित होते.
प्रारंभी सहा.प्रबंधक कमल किशोर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
प्रास्ताविक पंढरपूर शाखेचे मुख्य प्रबंधक भिवा लवटे यांनी केले, त्यामध्ये त्यांनी बँकेच्या विविध बचत योजना, त्याचबरोबर शेती, उद्योग,व्यवसाय, शैक्षणिक तसेच सोने तारण कर्जवाटप इ.बाबत माहिती दिली.
बँक गृह कर्ज सर्वात कमी दराने देत असल्याचे सांगुन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख अतिथी शशिकांत हरिदास यांनी बँकेचे देशाच्या विकासातील योगदानाबद्दल माहिती देवुन वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.तसेच
बँकेचे लवकरात लवकर नविन तळमजल्यावरील जागेत स्थलांतर व्हावे, पैसे देवाण घेवाण करण्यासाठी जादा खिडकी उघडली जावी म्हणजे ग्राहकांना जलद व अधिक समाधानकारक सेवा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली . तालुका संघटक महेश भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शैक्षणिक व शेती कर्जाचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले.
यावेळी ग्राहक प्रतिनिधी प्रा.दिग्विजय रोंगे, निवृत्त सपोफौ.सुनिल हरिदास, दुग्धालयाचे शशिकांत कराळे, शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या ग्राहक मेळाव्यासाठी बँकेचे अधिकारी नरेंद्र कुमार, कर्मचारी सिताराम देठे, रविकिरण शिकारे यांनी विशेष परिश्रम घेतले.