एमआयडीसी कारखाना परिसरात करण्याची केली मागणी
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना भेटून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या लगत "एम.आय.डी.सी."च्या निर्मितीबाबत प्रस्ताव श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सादर केला !
उद्योगांना आवश्यक असणाऱ्या वीज, रस्ते आणि पाणी ३ या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आधीपासून उपलब्ध असल्याने उद्योगांसाठी आणि सरकारसाठी या ठिकाणी "एम.आय.डी.सी." उभारणी करणे सोयीचे आहे, असे सन्माननीय मंत्री महोदयांना अवगत करुन दिले.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना परिसरात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जाऊ शकतो, पर्यायाने परिसराचा विकास करण्याचा मानस आहे.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख श्री.महेश नाना साठे व शिवसेना नेते श्री.संजय कोकाटे साहेब उपस्थित होते.