अकलूज प्रतिनिधी
शंकरराव मोहिते महाविद्यालयात आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या सिनेटसाठी प्रतिनीधी, संस्था प्रतिनिधी,शिक्षक व पदवीधर तसेच विविध अभ्यास मंडळे यांचे निवडी करता आज मतदार झाले.या मतदान केंद्रामध्ये संस्था प्रतिनिधी तसेच शिक्षक सिनेटसाठी 100 टक्के मतदान झाले असून पदवीधर सिनेटसाठी 48.85 टक्के मतदान झाले आहे.
या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी संस्था प्रतिनिधी म्हणून अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शन संचालक, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील, शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, व शिवरत्न शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.शितलदेवी मोहिते पाटील तसेच शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे,माजी प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
या महाविद्यालयाच्या मतदान केंद्रासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे उत्तम आण्णा राक्षे हे मतदान केंद्राध्यक्ष तर मंगेश नवनाथ गोवर्धन यांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले.तर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयाचे नाना साठे व सुरेश बनपट्टे यांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले.या मतदान केंद्रावर मतदान अत्यंत शांततेत पार पडले असून यासाठी शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे मोलाचे सहकार्य लाभले.