पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी सुचना,हरकती दिल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास व संघटक दीपक इरकल यांनी दिली.
पंढरपूर विकास योजनेअंतर्गत दर्शन बारी- ( स्वयंचलित ) स्काय वॉक, सुसज्ज दर्शन हॉल, नदीघाट जोडणी, नदीचे दोन्ही तीर जोडणी,दशक्रिया घाट,सुसज्ज अग्नीशमन व्यवस्था,प्रशासकिय इमारत, वाहन तळ, स्वच्छता गृहे,मुबलक पाणी पुरवठ्यासाठी नविन टाक्या,विस्तारीत भागात नविन उद्याने,जुन्यांचा विकास , शहरातील व विस्तारीत भागात भाजी मंडई विकास, नविन क्रीडांगणे, वैकुंठ भुमी (विद्युत, गॅसदाहीनी) विकास ,शहरातील वाहतूक व्यवस्था, भजनदास चौक ते अंबाबाई पटांगण, काळा मारुती ते इंदिरा गांधी भाजी मंडई रस्ता रुंदीकरण इ. बाबत सविस्तर हरकती व सूचना लेखी निवेदनात केल्या आहेत.
तसेच यापूर्वी अनेक विकास कामा अंतर्गत रस्ता रुंदीकरण झालेली आहेत. मंदिर परिसर, प्रदक्षणा मार्ग, नवी पेठ ते अंबाबाई पटांगण, नाथ चौक ते भादुले चौक इ. मार्गाचे रुंदीकरण झालेले आहे. मात्र सर्वत्र झालेल्या अतिक्रमणामुळे हे रस्ते अपुरे पडत आहेत.त्याचा त्रास भाविकांना, नागरिकांना होत आहे. अतिक्रमणावर रस्ता रुंदीकरण हा पर्याय नाही.
त्यासाठीअतिक्रमण मुक्त परिसर ठेवल्यास कोणालाही विस्थापित व्हावे लागणार नाही. त्यामुळे आंदोलन करण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. रस्ता रुंदीकरणाचा निधी इतर विकास कामासाठी वापरता येईल.
वर्षभरात *आषाढी,कार्तिकी,चैत्र, माघ या चार मोठ्या यात्रा कालावधीसाठी सुमारे ६० दिवस फक्त भाविकांची मोठी गर्दी होते. सध्या यात्रा कालावधीत कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे या भागात लगेच रस्ते रुंदीकरण गरजेचे नाही याचा गांभीर्याने. विचार व्हावा असे निवेदन दिल्याचे *अ. भा ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव सुहास निकते* यांनी सांगितले.
*ठळक*
१) दर्शन रांग -मंदिर ते विशेष गल्ली-थेट चंद्रभागा नदी पात्र-घाटाच्या कडेने संपूर्ण स्वयंचलित स्काय वॉक -पंचमुखी मारुती-वैकुंठ भुमी घाट-त्याठिकाणी सुसज्ज दर्शन हॉल- गोपाळपूर-रांजणी रस्ता पर्यंत कडेने कायमस्वरूपी फुटपाथ. यामुळे वाहतूक अडथळा निर्माण होणार नाही.
२) शिवाजी महाराज चौक ते महाद्वार घाट हा परिसर अतिक्रमण मुक्त राहण्यासाठी कार्यक्षम यंत्रणा.
३) श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप - संपूर्ण पाडु नये.यामधील काही मजले, काही भाग कमी करुन ,सुधारणा करुन मंदिर प्रशासकीय मुख्यालय, अग्निशमन दल,रुग्णवाहिका, आरोग्य केंद्र,इ.साठी.
४) पायाभूत सुविधा- बहुमजली वाहन तळ व व्यापारी संकुल
सहकार चौक लिमये वाडा , इंदिरा गांधी भाजी मंडई, हनुमान मैदान, सरकारी दवाखाना, नवी पेठ झेंडा चौक,
रुक्मिणी पटांगण व्यापारी संकुल मंदिर पोलीस चौकी व महिला पोलीस कर्मचारी विश्रांती कक्ष.
५)उद्याने सध्याच्या उद्यानांचा विकास व विस्तारित इसबावी,टाकळी भागात नविन उद्याने
६) क्रीडांगण- अंबाबाई पटांगण येथे क्रीडा संकुलासाठी राखीव.
विस्तारित भागात नव्याने क्रीडांगण निर्माण.
७) नदीच्या दोन्ही तीरावर जाण्यासाठी सेतू .
८) दशक्रिया घाट-नियोजित जागा चुकीची त्यामुळे सर्व सोयी सुविधा युक्त हॉल - महाद्वार घाट ते कुंभार घाट या भागातच आवश्यक
९) वाहतूक व्यवस्था - स्वयंचलित वाहतूक नियंत्रण व्यवस्था निर्माण करावी. दुचाकी,रिक्षा थांबे,
१०) वैकुंठ भुमी (विद्युतदाहिनी व गॅस दाहिनी) विकास करण्यात यावा.
११) प्रदक्षणा मार्ग,सावरकर पथ ( स्टेशन रोड) याभागात महिला स्वच्छता गृह आवश्यक.
अतिक्रमण होऊ नये म्हणून सर्व नियोजित व्यापारी संकुलात अल्पदरात दुकाने उपलब्ध करण्यात यावीत.
सर्व विकास कामे दर्जेदार होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी.