सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन अंतर्गत सोलापूर वन विभाग सोलापूर महानगरपालिका व लायन इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब आॕफ सोलापूर ट्विन सिटी, युगंधर फाउंडेशन व इतर अनेक शाळा आणि सेवाभावी संस्थेच्या लोक सहभागातून वन शहीद दिवसाचे औचित्य साधून वन संरक्षण साठी वृक्षदिंडी काढण्यात आली.
त्यानंतर सिद्धेश्वर वन विहार विजापूर रोड येथे 5000 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले याचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख व माजी आमदार नरसिंग मेंगजी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी कदम वन आधिकारी धैर्यशील पाटील लायन्स क्लब ट्विन सिटीचे अध्यक्ष इंजिनीयर सागर पुकाळे युगंधर फाउंडेशनच्या प्रा. रश्मी माने यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाचा सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर लायन्स क्लब आॕफ सोलापूर ट्विन सिटी सहकार्याने वेगवेगळ्या शाळा संस्था यांचे विद्यार्थी शिक्षक व विविध सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी या सर्वांनी मिळून सिद्धेश्वर वनविभागाच्या सुमारे 500 एकर जागेवर एकाच दिवशी एकाच ठिकाणी व एकाच वेळी 5000 वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सचिव लायन इंजिनियर रविकिरण वायचळ, लायन नागेश बुगडे, लायन नंदिनी जाधव लायन औदप्पा पुजारी रेवनसिद्ध मिळकुंदे सिद्धेश्वर यादव युगंधर फाऊंडेशनच्या प्राध्यापिका प्रा. रश्मी माने माऊली लँडमार्क चे माऊली झांबरे अश्विनी झांबरे पर्यावरण प्रेमी इंजिनीयर अनिल जोशी यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.