समाजाप्रती आपण समाजाचे काही देणे लागतो, रंजल्या गांजल्यांसाठी निस्वार्थीपणे सेवा करणं,अनाथ, अपंग, गरीब, गरजु व्यक्तींना मदत करण हा त्यांचा स्वभाव धर्म.अशा परोपकारी व्यक्ती समाजात कमी असतात,पण महाराष्ट्रातील वृध्दाश्रम, अनाथाश्रम, महिला आश्रम,बालकाश्रम, विविध शहरांतील शाळांमध्ये शैक्षणिक मदत करण, जीवनावश्यक वस्तूंची मदत, कुठल्याही प्रकारचा मोठेपणा न दाखविता पडद्यामागील भरीव समाजकार्य करणारे समाजभूषण-कार्यसम्राट व्यक्तीमत्व म्हणजे ॲंन्टीपायरसी सेलचे मुंबई चे मुख्य तपासी अधिकारी श्री.रामजित(जितू) गुप्ता सर.इतरांच्या कामाचे कौतुक करणारे,त्यांना सन्मानित करणारे, समाजातील विविध क्षेत्रातील आदरणीय, सन्माननिय प्रतिभावंत व्यक्तींना पुरस्काररुपी पाठीवर शाबासकीची थाप देणारे आणि त्यांचे मनोबल वाढविणारे समाजसेक म्हणजे जितू सर.पुरस्कार हे प्रेरणा देतात.
त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कार्य सम्राटांना सन्मानित करण्यासाठी इंडियन काॅपीराईट प्रोटेक्शन(ॲंन्टीपायरसी सेल मुंबई) आयोजित'भारत विश्वरत्न पुरस्कार२०२६, सोहळा नुकताच के.एम.अग्रवाल काॅलेज,एसी ऑडिटेरियम,पडघा रोड,खडकपाडा, कल्याण पश्चिम येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या पुरस्कार सोहळ्याला इंडियन आर्मीचे सुभेदार महेंद्र गवई, भारुड सम्राट गोविंद महाराज गायकवाड, विकास खर्चे, अभिनेत्री नेहा जोशी, लेखिका कवयित्री अनिता गुजर, डॉ.जितेंद्र जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, आर्थिक, पत्रकारिता, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर गुणवंत प्रतिभावंत व्यक्तींना पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.स्वामी समर्थांचे दर्शन हे दृश्य विलोभनीय असेच होते, भारुड सम्राट गोविंद महाराज गायकवाड यांच्या विनोदी भारुडाने उत्कृष्ट सामाजिक संदेश दिला गेला.ज्युनियर दादा कोंडके यांची काॅमिडी,शाहीर सीमाताई पाटील यांची शाहीरी,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे हुबेहूब दर्शन, हास्य दरबार असे विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी पुरस्कार सोहळ्यात रंगत आणली.
यावेळी जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, सहखजिनदार श्रुती उरणकर, दिलीप शिरसाठ, गंधाली तिरपणकर, सुनिल इंगळे,संजीवनी पाटील, रोहिणी शिंदे या जनजागृती च्या पदाधिकारी सदस्यांनी समाजसेक रामजित (जितू) गुप्ता यांचा यथोचित सत्कार करुन त्यांचे अभिनंदन केले.
इंडियन काॅपीराईट प्रोटेक्शन आयोजित भारत विश्वरत्न सोहळ्याचे उत्कृष्ट रुपरेषा, आयोजन, नियोजन केल्याबद्दल आदरणीय राममजित(जितू) गुप्ता यांचे प्रमुख पाहुणे व सर्वच सन्माननीत पुरस्कार्त्यांनी त्यांचे आभार, कौतुक व अभिनंदन केले आहे.

