हिरडगाव प्रतिनिधी तेज न्यूज
गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड, हिरडगाव युनिट नं. 04 चा चतुर्थ *बॉयलर अग्नी प्रदीपन, गव्हाण पूजन व मोफत साखर वाटप समारंभ* आज रविवार दिनांक 25/10/2026 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता आपले ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुरावजी बोत्रे पाटील , ओंकार ग्रुपच्या संचालिका सौ. रेखाताई बाबुरावजी बोत्रे पाटील, संचालक ओमराजे बोत्रे पाटील व सौ व श्री प्रिया अमोल दरेकर यांच्या शुभहस्ते व ओंकार शुगर ग्रुपच्या सीईओ तेजस्विनी बर्गे, जनरल मॅनेजर वसंत रायभान चरमळ तसेच इतर अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
ओंकार ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये 34 साखर कारखाने चालवण्याचे नियोजन असल्याचे ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुरावजी बोत्रे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. साखर उत्पादनाबरोबरच सहवीज निर्मिती व डिस्टिलरी, इथेनॉल, सीएनजी, सीबीजी उत्पादनावर भर दिला जाणार आहे.
यावेळी कामगारांना 20 टक्के पगार वाढ देण्यात आलेली असून, शेतकरी केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, तसेच उच्चांकी ऊस दर व वेळेत पेमेट, विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट ठेऊन, शेतकऱ्यांनी त्यांनी दिलेल्या उसाचे टनेज प्रमाणे त्यांना मोफत साखर वाटप होणार आहे.
या घोषणांची उपस्थित शेतकरी, कामगार, वाहतूकदार आणि ऊस तोडणी वाहतूकदारांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. राज्यात शेतकऱ्यांना मोफत साखर देण्याचा उपक्रम ओंकार ग्रुप राबवत असल्यामुळे उपस्थित यांनी समाधान व्यक्त केले. तसेच शेतकऱ्यांची व तोडणी वाहतुकीची बिले गतिमान पद्धतीने आठ दिवसाच्या आत अदा केली जातील असे त्यांनी जाहीर केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस, लक्ष्मण बापू फराटे, पांडुरंग नाना फराटे, नवनाथ दादा शितोळे व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला दिनू पंधरकर, अरुण पाचपुते, सुरेश क्षीरसागर, सचिन दादा चौधरी, महादेव फराटे, नवनाथ फराटे, संपत अण्णा दरेकर, चिमाजी दरेकर, मा.श्री दादा बनकर, अमोल दरेकर, बाळासाहेब घोलप, दत्ता गायकवाड, भूषण बडवे, माऊली जगताप व इतर अन्य मान्यवर, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, पत्रकार बांधव, तोडणी वाहतूक कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सर्व उपस्थित मान्यवरांचे कारखान्याच्या वतीने शेती अधिकारी देवकर एन एस यांनी आभार मानले.

