डोंबिवली प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंट च्या संचालिका आणि ऑर्गनायझर शर्मिला केसरकर या नेहमीच शहराच्या विविध भागात ऑर्केस्ट्रा आयोजित करुन संगीतमय हा सांस्कृतिक ठेवा जपण्याचा प्रयत्न करत आहेत.
शर्मिला केसरकर यांच्या संगीतमय प्रवासाला श्रवणीय रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसादही मिळत आहे.त्याच अनुषंगाने डोंबिवली पूर्व येथील सर्वेश हाॅल मध्ये'गाता रहे मेरा दिल'या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते.जुन्या हिंदी चित्रपटसृष्टीतील भावपूर्ण गीते, मनाला भिडणाऱ्या चाली आणि अविस्मरणीय संगीताच्या अनुभव रसिकांना मिळाला.
मुकेश यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.या कार्यक्रमात डॉ.राजेद्र काळे त्यांच्या गायनातून जुन्या गीतांच्या सादरीकरणी करणातून जुन्या हिंदी गीतांची गोडी आणि संगीताचा सुवर्णकाळ अनुभवता आला.
तसेच श्री.पेंडसे, गणेश मांजरेकर, धनंजय बरबडे,वीणा देवळेकर, संजय कुलकर्णी, अतुल खरे,अर्शिता,शेखर गोपाल, मीनाक्षी दरवेशी, अनुराधा कोंडाळकर, अतुल देसाई, भालचंद्र कोंढाळकर,कु.कियान कोंढाळकर,स्नेहा सावंत,डाॅ.माणिक काळे, नितीन ठाकर, श्रीनिवास, मनीषा काळे या प्रतिभावंत, प्रतिथयश गायक, नायिकांनी वेगवेगळी सुमधुर गाणी सादर करुन रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.शर्मिला केसरकर या म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंट च्या संचालिका, ऑर्गनायझर आणि गायिका ही आहेत.
या कार्यक्रमासाठी जनजागृती सेवा संस्था ही प्रिंट मिडिया पार्टनर म्हणून सहभागी झाली आहे.संगीताचा आनंद अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहचविण्यासाठी जनजागृती चे सहकार्य लाभले.कार्यक्रमाच्या सोशल मीडिया व्यवस्थापनाची जबाबदारी तनया केसरकर यांची होती.संगीत संयोजनाची जबाबदारी तूषार बने यांनी समर्थपणे सांभाळली.संजय सेन गुप्ता यांनी व्हिडिओग्राफर म्हणून उत्कृष्ट काम केले.आकाश यांनी ऑडिओ साऊंड ची कामगिरी उत्तमरीत्या पार पाडली.
यावेळी जनजागृती सेवा संस्थेचे जेष्ठ सल्लागार अरविंद सुर्वे, अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, सहखजिनदार श्रुती उरणकर, रोहिणी शिंदे, सविता ठाकुर, श्रीराम वैद्य या संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंट च्या संचालिका ऑर्गनायझर आणि गायिका शर्मिला केसरकर यांचा शाल, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी उषा हाॅस्पिटलीटीचे संचालक व संस्थेचे जेष्ठ सल्लागार अरविंद सुर्वे यांचे विशेष सहकार्य लाभले.रसिक प्रेक्षकांनी'गाता रहे मेरा दिल'या संगीतमय कार्यक्रमात जुन्या नवीन गाण्यांचा श्रवणीय आनंद घेतला.

