माण नदी खोऱ्यातील दुष्काळी परिस्थितीवरील संशोधनाबद्दल गौरव; संस्थेचे सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते सत्कार
सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये गेली १२ वर्षे अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन करणारे अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत असणारे प्रा. एन. डी. बंडगर यांना कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाकडून अर्थशास्त्र विषयातील 'पीएचडी' (डॉक्टरेट) पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या विशेष यशाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात
प्रा. एन. डी. बंडगर यांनी अर्थशास्त्र विषयात "Policy, Planning & Control of Drought Situation in Man River Basin" (माण नदी खोऱ्यातील दुष्काळी परिस्थितीचे धोरण, नियोजन आणि नियंत्रण) या विषयावर सखोल संशोधन करून आपला प्रबंध विद्यापीठास सादर केला होता. त्यांच्या या मौलिक संशोधनाची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठाने त्यांना विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवीने सन्मानित केले आहे.
सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमध्ये गेल्या १२ वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करत असतानाच प्रा. बंडगर यांनी लेखन व संशोधनातही सातत्य ठेवले आहे. आतापर्यंत विविध नामांकित वृत्तपत्रांतून त्यांचे अर्थशास्त्रावर आधारित ६६ लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी ५ आंतरराष्ट्रीय, विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषदा आणि चर्चासत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचे ३ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
कमलापूर (ता. सांगोला) गावचे सुपुत्र असलेल्या प्रा. बंडगर यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत जिद्दीचा आणि प्रेरणादायी राहिला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा (कमलापूर), माध्यमिक शिक्षण आनंद विद्यालय (कमलापूर), तर उच्च माध्यमिक व पदवीपर्यंतचे शिक्षण सांगोला येथे झाले.
त्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात 'कमवा व शिका' योजनेतून त्यांनी एम.ए. (अर्थशास्त्र) हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे शासकीय महाराणी ताराबाई अध्यापक महाविद्यालय (बी.टी. कॉलेज, कोल्हापूर) येथून त्यांनी बी.एड. पदवी प्राप्त केली व त्यानंतर पीएचडीचे संशोधन पूर्ण केले. या संशोधन कार्यात त्यांना मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. सुभाष कोंबडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यासोबतच अर्थशास्त्र विभागप्रमुख व सामाजिक शास्त्र अधिष्ठाता प्रा. डॉ. एम. एस. देशमुख, प्रा. डॉ. ज्ञानदेव तळुले, माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. वसंतराव जुगळे, प्रा. डॉ. विजय ककडे, प्रा. डॉ. पी. एस. कांबळे, प्रा. डॉ. व्ही. पी. कट्टी आणि प्रा. डॉ. शशिकांत पंचगले यांचेही सहकार्य लाभले.
या यशाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ॲड विजयसिंह चव्हाण,सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारिणी सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके सर्व संस्था सदस्य, प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक काकासो नरूटे शुभांगी घोंगडे, मकरंद अंकलगी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

