सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिवसेना उपनेत्या (UBT) अस्मिता गायकवाड यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅन्के करिता 2 गटातुन उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करत केला दाखल करण्यात आला आहे.
*दुष्काळी स्थिती लक्षात घेता सर्वसमावेशक नेतृत्वातून निवडणुक बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.आपणही पुढाकार घेणार आहे.अस्मिता गायकवाड
सोलापुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅन्केची निवडणूक उच्च न्यायालयाचे आदेशाच्या निर्देशानुसार घेण्यात येत आहे. १९ जागा करिता निवडणूक होत आहे . सन २०१८ पासून बॅन्केवर प्रशासक राजवट सुरू आहे. येत्या २६ नोव्हेंबरला मतदान होत आहे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी महिला प्रती निधी व नागरी सहकारी बॅन्का व पतसंस्था प्रतीनिधी या दोन गटातून आपला उमेदवारी अर्ज गुरूवारी सकाळी ११.३० ला दाखल केला आहे
त्यां गेली ३० वर्ष सहकार क्षेत्रात बॅन्क ,पतसंस्था,गृह निर्माण संस्था,पणन संस्था ,दुध संस्था या सस्थांच्या व्यवस्थापकीय मंडळावर कार्यरत आहेत.विशेष करून मनोरमा परिवार व वैभव लक्ष्मी व अस्मिता उद्योग समुह या माध्यमातून त्यांचे सहकार क्षेत्रात मोठे काम आहे. शिवाय त्या तीन वर्षापासुन बॅन्क असोसिएशन वर देखील प्रतिनिधीत्व करत आहेत.त्यामुळे लोक आग्रहावरून त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
त्यांचे जिल्ह्यातील विजयसिंह मोहिते पाटील, राजन पाटील, मा.सुशिलकुमार शिंदे, श्रीकांत मोरे, पालकमंत्री गोरे, खा.प्रणिती शिंदे, आ. सुभाष देशमुख ,आ.विजय देशमुख ,आ.अभिजीत पाटील ,रणजीत मोहिते पाटील ,आ. सचिन कल्याण शेट्टी , दिलीप माने,आ.दिलीप सोपल, प्रकाश कादे, सिध्दाराम म्हेत्रे, प्रशांत परिचारक,यांचेशी सलोख्याचे संबंध आहेत .
त्यामुळे सर्वाशी भेटुन जिल्हयातील दुष्काळी स्थिती विचारात घेता निवडणूक अविरोध व्हावी,सर्व समावेशक नेतृत्वाला संधी द्यावी म्हणून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले,
आपण सर्वांनी या सहकार क्षेत्रात राजकीय जोडे बाजूला ठेवून काम करण्याची गरज आहे.शेतकरी हित जपणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.यावेळी त्यांच्या महीला समर्थकानी मोठे शक्ती प्रदर्शन केले होते.

