पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथे मोहोळ न्यूजचे संपादक विजयकुमार मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा ज्येष्ठ पत्रकार प्रवीण शहा आणि तेज न्यूजचे संपादक प्रशांत माळवदे यांच्या हस्ते शाल, पुष्पहार व पुस्तक देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी विजयकुमार मोटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांना उत्तम आरोग्य लाभो, दीर्घायुष्य मिळो आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांच्या हातून अशीच उल्लेखनीय सेवा घडत राहो, अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी करण्यात आली.
या सत्कारामुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणित झाला. पत्रकारितेच्या क्षेत्रातील सहकाऱ्यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे विजयकुमार मोटे यांच्याविषयीचा स्नेह आणि आदर व्यक्त झाला.


